sitebar add

४) लठ्ठपणा/वजन वाढणे

लठ्ठपणा किंवा सतत वजन वाढणे हे पीसीओएसचे वैशिष्ट्य आहे. पीसीओएसच्यासुमारे ५०% महिला लठ्ठ असतात. खाण्याच्या सवयी आणि बदलत्या जीवनशैलीमुळे पीसीओएस असलेल्या महीला अधिक लठ्ठ होतात.
        पीसीओएसच्या महिलांमध्ये लठ्ठपणा हा एक सामायिक निकष आहे कारण त्यांच्या शरिरातील पेशी साखर/ग्लुकोजवर नियंत्रण ठेवणाऱ्या इन्सुलिन (रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणारे द्रव्य) नावाच्या संप्रेरकांला प्रतिकार करतात. हया इन्सुलिनच्या (रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणाऱ्या द्रवाच्या) प्रतिकारामुळे पेशींना साखरेचा / ग्लुकोजचा उपयोग करण्यास प्रतिबंध केला जातो जी चरबीच्या स्वरूपात साठविली जाते व अश्याप्रकारे त्यामुळे लठ्ठपणा येतो किंवा वजन वाढते.

इमेज

लठ्ठपणामुळे मासिक पाळीवर परिणाम होणाऱ्या संप्रेरकामध्ये देखील असमतोल होतो. तुम्ही लठ्ठ असल्यामुळे किंवा तुमचे वजन अधिक असल्यास, वजन कमी करण्याचा आणि आरोग्यसंपन्न आहार घेण्याचा सल्ला देण्यात येतो.

Comments

sitebar add 2

Popular posts from this blog

पीसीओएस काय आहे?

२) अनियमित मासिक पाळी

१) पॉलिसिस्टिक ओव्हरीज ( अंडाशयात पोकळ गाठी विकसित होतात)