Posts

Showing posts from December, 2017

sitebar add

घोरण्याकडे दुर्लक्ष करू नका..

Image
तुम्हाला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एप्निया असू शकतो  स्लिप एप्नियादरम्यान ऊर्ध्व  वायुमार्गाचा स्नायू पूर्णपणे शिथिल  होतात  आणि  १० सेकेंद  किंवा अधिक काळासाठी वायू प्रवाह संपूर्ण थांबतो. एप्नियादरम्यान व्यक्तीचे  श्वसन थांबते, आणि अशा  घटना  प्रेत्येक रात्री अनेक वेळा घडू शकतात. उपचार ना केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, जसे हृदय  रोग  । पक्षाघात  उच्च रक्तदाब  । मधुमेह OSA ची इतर लक्षणे  आहेत दिवसा अत्यधिक  झोप  येणे चांगली झोप  न लागणे । लट्टपणा  तुमच्या डॉक्टरचा  सल्ला घ्या.. 

आई सुंदर होण्यासाठी..!

Image
महिलेकडे एक स्त्री म्हणून न बघता ती माय माउली आहे, त्या मातृत्वाच्या आड काही समस्या जीवन मानात झालेल्या बसलामुळे येवू शकतात. त्याचा सखोल अभ्यास डॉ. कांबळे यांनी केला. प्रत्येक स्त्री का आई व्हायचे असत, नव्हे तर प्रत्येक स्त्री मध्ये एक सुंदर आई दडलेली असते, अश्या सुंदर आईला स्वतः त्याचा शोध घेता येतो. पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रेम (पीसीओएस) ही पुनुरुत्पादकक्यादरम्यानअसणाऱ्या (वय वर्षे १५-४५) महिलांना भेडसावणारी सह्याची सर्वाधिक सामायिक समस्या आहे. पीसीओएसवर मात कसण्यासाठी त्याचप्रमाणे त्याच्या किचकट समस्या टाळण्यासाठी कोणत्या सर्व महत्वाच्या गोष्टीची आपल्याला माहिती होणे गरजेचे आहे हे आपण समजून घेणे महत्त्वाचे आहे कारण त्यावर उपचार करण्यात आले नाहीत तर त्यामुळे व्यंधत्व (अपत्यास जन्म देऊ ना शकणे) येऊ शकते. ...सांगत आहे डॉ. सुरेश कांबळे - मुख्य आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, सावरगाव.

पीसीओएस काय आहे?

Image
भारतात अशा वयातील सुमारे ३६% महिलांना पीसीओएस चा त्रास होतो किंवा अचूकपणे प्रत्येकी ४४ पैकी १ महिलेला पॉलिसिस्टिक ओव्हरीज होतो. सद्यपरिस्थितील कोणत्याही सामाजिक किंवा प्रसिद्धी माध्यमाच्या आघाडीवर पीसीओएस हा महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत सर्वाधिक चर्चेत असलेला एक विषय आहे. ही समस्या अतिशय सामाजिक आहे आणि आपल्यापैकी कोणालाही होऊ शकते. पीसीओएस वर मात करण्यासाठी त्याचप्रमाणे त्याचा किचकट समस्या टाळण्यासाठी कोणत्या सर्व महत्वाच्या गोष्टींची आपल्याला माहिती होण्याची गरज आहे, हे आपण समजून घेणे महत्वाचे आहे. कारण त्यावर उपचार करण्यात आले नाहीत तर त्यामुळे वंध्यत्व (अपत्यास जन्म देऊ न शकणे) येऊ शकते.

पीसीओएसची लक्षणे

Image
१. पुरुळ/मुरुमे आणि हारसुटीझम (मुख्यत: चेहऱ्यावर किंवा शरीरावर अनावश्यक केसांची जास्त वाढ होणे) २. लठ्ठपणा/वजन वाढणे ३. अनियमित मासिक पाळी ४. पिगमेन्टेशन (रंगद्रव्याचा थरामुळे त्वचेला आलेला रंग), खास करून मानेवर व काखेत. ५. पॉलिस्टिक ओव्हरीजची (अंडाशयात पोकळ गाठी विकसित होतात) - अल्ट्रा सोनोग्राफी (यूएसजी) द्वारे खात्री देता येऊ शकते. पीसीओएसच्या लक्षणांना लवकर सुरुवात होऊ शकते, बहुतेक बाबतीत किशोर अवस्थेतील उशिराच्या आणि प्रौढपणाच्या सुरवातीच्या टप्प्यात ही लक्षणे दिसू शकतात. पीसीओएस चे बहुतेक वेळा पुरळ/मुरमे आणि हर्सिटीजम (मुख्यत: चेहऱ्यावर किंवा शरीरावर अनावश्यक केसांची जास्त वाढ होणे) यासारख्या दिसून येणाऱ्या लक्षणांवरून चुकीचे रोगनिदान केले जाते किंवा कॉस्मेटँजीकल बाबी म्हणून स्वतःच रोगनिदान केले जाते. मोठ्याप्रमाणात महिलांना त्यांच्या मासिक चक्राच्या समस्या झाल्याखेरीज किंवा त्यांना गर्भधारणा होण्याच्या अडचणी येईपर्यंत त्यांना पीसीओएस झाला आहे हे माहित किंवा समजत देखील नाही.

१) पॉलिसिस्टिक ओव्हरीज ( अंडाशयात पोकळ गाठी विकसित होतात)

Image
प्रत्येक महिलेला दोन अंडाशय असतात ज्या गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला असतात, प्रत्येक अंडाशय साधारण एका मोठया गोटीच्या आकाराचा असते. अंदशयात अंडी आणि वेगवेगळी संप्रेरके तयार होतात. साधारणपणे, प्रत्येक मासिक पाळी दरम्यान, अंदशयात अनेक लहान केसांची वाढ होते आणि अंडी तयार होतात. पाळीच्या मध्यभागी एका अंदशयातुन बीजवाहिने एक अंडे सोडले जाते. याला ' ओव्हउलेशन ' प्रकिया असे म्हणतात. इतर कोश अधिक परिपक्व होतात आणि फुटतात. पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये,  ओव्हीलोशन होत नाही, आणि अंडी मुक्त केली जात नाही. कोश फुटत नाहीत, परंतु ते द्रवापदार्थाने भरतात आणि पोकळ गाठी होतात ज्या एखादया द्राक्षाच्या घडासारखे दिसतात. अंडाशय फुटल्यामुळे, कधीकधी ते सामन्यात प्रमाणापेक्षा दोन ते पाच पट मोठे होतात. तुम्हाला पॉलिसिस्टिक ओव्हरीज आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी तुमचे डॉक्टर अल्ट्रासाऊंड स्कॅन करण्याचा सल्ला देण्याची शक्यता आहे.

२) अनियमित मासिक पाळी

Image
Image by abpmaza.com पुनरुत्पादन वयातील महिलेचे मासिक चक्र सरासरी २८  दिवसाचे असते, पण ते २५ ते ३५ दिवसांच्या दरम्यान असू शकते. पीसीओएस महिलांमध्ये, मासिकपाळी साधारणपणे ३५ दिवसाच्या (अनियमित मासिक पाळी) कालांतराने येते किंवा येत नाही. आपण अगदी अलीकडच्या अभ्यासाचा विचार केला तर पीसीओएस असलेल्या सुमारे ९९% महिलांची मासिक पाळी अनियमित असते. तुमचे मासिक चक्र अनियमित असल्यास, खूप उशीर होण्यापूर्वी उपाययोजना करा आणि कृपया तुमच्या डॉक्टरांचा शक्य तितक्या लवकर सल्ला घ्या.

३) पुरुळ/मुरुमे आणि हारसुटीझम (मुख्यत: चेहऱ्यावर किंवा शरीरावर अनावश्यक केसांची वाढ होणे):

पुरळ आणि हरसुटीझम मुख्यत: चेहऱ्यावर किंवा शरीरावर अनावश्यक केसांची वाढ होणे) ही एक पीसीओएसची सर्वाधिक सामायिक दिसून येणारी लक्षणे आहेत. हर्सिटीजम म्हणजे केसांची जास्त प्रमाणात वाढ होणे, जी साधारणपणे नितंब, पाठ, छाती, किंवा चेहऱ्यावर होते. पुरळ हा त्वचेचा रोग असतो ज्यात मुरम्यासारख्या लहान पुटकुळ्या तयार होतात. पुरुळ/मुरमे साधारपणे चेहरा, पाठ आणि छातीवर येतात. पीसीओएस असलेल्या सुमारे ७५% महिलांना हरसुटीझम असतो आणि पीसीओएस असलेल्या सुमारे ३४% महिलांना पुरुळ/मुरमे होतात. पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये, अंदशयातील गाठींमुळे सुप्रेरकाचा असमतोल होतो. त्यामूळे पुरूषी संप्रेरकांचे (उदा. टेस्टोस्टेरॉन) उत्पादन अधिक प्रमाणात होते, पुरूषी संप्रेरकांमध्ये अधिक प्रमाणात वाढ होण्यामुळे पुरळ/मुरुमे आणि हरसुटीझम (मुख्यत: चेहऱ्यावर किंवा शरीरावर अनावश्यक केसांची जास्त वाढ होणे).

४) लठ्ठपणा/वजन वाढणे

लठ्ठपणा किंवा सतत वजन वाढणे हे पीसीओएसचे वैशिष्ट्य आहे. पीसीओएसच्यासुमारे ५०% महिला लठ्ठ असतात. खाण्याच्या सवयी आणि बदलत्या जीवनशैलीमुळे पीसीओएस असलेल्या महीला अधिक लठ्ठ होतात.         पीसीओएसच्या महिलांमध्ये लठ्ठपणा हा एक सामायिक निकष आहे कारण त्यांच्या शरिरातील पेशी साखर/ग्लुकोजवर नियंत्रण ठेवणाऱ्या इन्सुलिन (रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणारे द्रव्य) नावाच्या संप्रेरकांला प्रतिकार करतात. हया इन्सुलिनच्या (रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणाऱ्या द्रवाच्या) प्रतिकारामुळे पेशींना साखरेचा / ग्लुकोजचा उपयोग करण्यास प्रतिबंध केला जातो जी चरबीच्या स्वरूपात साठविली जाते व अश्याप्रकारे त्यामुळे लठ्ठपणा येतो किंवा वजन वाढते. इमेज लठ्ठपणामुळे मासिक पाळीवर परिणाम होणाऱ्या संप्रेरकामध्ये देखील असमतोल होतो. तुम्ही लठ्ठ असल्यामुळे किंवा तुमचे वजन अधिक असल्यास, वजन कमी करण्याचा आणि आरोग्यसंपन्न आहार घेण्याचा सल्ला देण्यात येतो.

५) पिगमेन्टेशन (रंगद्रव्याचा थरामुळे त्वचेला आलेला रंग)

खास करून मानेवर आणि काखेत:       पीसीओएस असेलेल्या महिलांना मानेच्या मागच्या भागावर, काखेत, कपाळ, कदाचित शरीराच्या एखाद्या इतर भागावर पिगमेन्टेशन (रंगद्रव्याचा थरामुळे त्वचेला आलेला रंग) किंवा त्वचेवर गडद रंगाचे चट्टे पडू शकतात. इमेज रक्तातील इन्सुलिन (रक्तातील साखरेचे प्रमाणावर नियंत्रण ठेवणारे द्रव्य) संप्रेरक खुप जास्त होण्यामुळे असे होऊ शकते, ताबडतोब एखादया स्त्रीरोगतज्ज्ञशी सल्लामसलत करावी.

६) वंध्यत्व ( अपत्यास जन्म न देऊ शकणे)

म्हणजे गर्भधारणा होण्यास त्रास होणे (गर्भावस्था) पीसीओएस हे सध्याचा काळात वंध्यत्वाचे एक सर्वाधिक सामायिक कारण आहे. पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये मासिक पाळीची अनियमितता किंवा ती न येणे हे बहुतेक वेळा ओव्हउलेशन न होण्याशी संबधित आहे (अंधशाय अंडी तयार होणे आणि मुक्त होणे), ज्याच्यामुळे गर्भधारणा होण्याची किंवा गरोदर राहण्याची शक्यता कमी होते. तुम्हाला गर्भधारणा होण्यास त्रास होत असल्यास, आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञचा सल्ला घ्या. कारण तुम्हाला पीसीओएस असू शकतो.

पीसीओएससाठी योग्यवेळी उपचार न घेतल्यास काय परिणाम होतात?

पीसीओएस बद्द्ल समजून घेण्याची गरज इमेज असणारी एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही फक्त कॉस्मेटिक किंवा मासिक पाळीच्या समस्या नाही. ते अनेक दीर्घकालीन समस्या निर्माण होण्याच्या जोखमेशी निगडित असू शकते. पीसीओएस असलेल्या महिलेने लक्षणे नाहीशी झाली तरीसुध्दा रजोनिवृत्तीपर्यंत तिच्या आरोग्याची स्त्रीरोगतज्ज्ञ द्वारा नियमित पद्धतीने तपासणी करून इमेज घेणे महत्वाचे असते.

उपचार न केलेल्या पीसीओएस असलेल्या महिलेला खालील स्थिती किंवा राग होण्याची जास्त जोखीम असते:

◆ वंध्यत्व ( अपत्यास जन्म न देऊ शकणे) गरोदर न राहता येणे  आगीदारच चर्चा केल्याप्रमाणे, पीसीओएस हे इमेज व्यंधत्वचे किंवा गरोदर न राहता न येण्याचे सामाईक कारण आहे. अशाप्रकारे वंध्यत्वाची भविष्यातील जोखीम टाळण्यासाठी पीसीओएस लवकर निदान करणे अत्यावश्यक आहे. ◆ मधुमेह पीसीओएस असलेल्या सुमारे ५०% महिलांना ४० वर्षे वय होण्यापूर्वी मधुमेह होतो किंवा मधुमेह पूर्व स्थिती होते. त्यामुळे, तुम्हाला पीसीओएस असलेल्या, मधुमेह टाळण्यासाठी व्यायाम करण्याची आणि खाण्याची सवयीत बदल करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. ◆ रक्तातील कोलेस्टेरॉल वाढणे आणि वृदयाशी संबधित रोग. इमेज पीसीओएस असलेल्या महिलांना रक्तातील कोलेस्टेरॉल जास्त वाढण्याची अधिक शक्यता असते. वृदयाशी संबधित रोग हा कोलेस्टेरॉलशी अधिक संबधित असल्यामुळे पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये अश्या समस्या (वृदयाचा झटका) होण्याची जोखीम वाढू शकते. ◆ गर्भावस्थेतील किचकट समस्या: पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये गर्भावस्थेच्या दरम्यान किचकट समस्या होण्याची अधिक शक्यता आहे. ह्यात बाळाचा खुप लवकर जन्म होणे किंवा गर्भावस्थेत रक्तदाब वाढणे ( प्री एकलम्पिसि...

पीसीओएस ची कारणे काय आहेत?

आपल्याला आता माहीत आहे की पीसीओएस हा अनेक कारणांमुळे होणारा रोग आहे. पीसीओएसची संभाव्य कारणे खाली देण्यात आली आहेत. ◆ जीवनशैलीतिल बदल: आरोग्यास अपायकारक असलेले जंक फूड खाणे आणि इमेज व्यायाम ना करणे यामुळे महिलांचे वजन वाढते. लठ्ठपणा किंवा वजन वाढण्यामुळे संप्रेरकांचा असमतोल होतो ज्यामुळे तुमच्या मासिक पाळीवर परिणाम होतो. ◆ इन्सुलिनला (रक्तातील साखरेचे प्रमाणावर नियंत्रण ठेवणाऱ्या द्रव्याला) प्रतिकार ५० - ८०% घटनांमध्ये इन्सुलिनचा  (रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणाऱ्या द्रवाच्या) प्रतिकार हे महत्वाचे कारण असते. त्यामुळे देखील महिलांचे वजन वाढते, ज्यामुळे पीसीओएसच्या लक्षणांची स्थिती अधिक खराब होते. ◆ संप्रेरकाचा असमतोल: ठराविक संप्रेरकाचा असमतोल हे पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये सामायिक कारणे आहे. ◆ कौटुंबिक इतिहास: एखाद्या महिलेची आई, मावशी किंवा बहिणीला पीसीओएस असल्यास / झाला असल्यास तिला तो होण्याची इमेज अधिक शक्यता असते.

डॉक्टरांकडे कधी जावे?

तुम्हाला पुरळ/मुरमे, किंवा हारसुटीझम (मुखत: चेहऱ्यावर किंवा शरीरावर अनावश्यक केसांची जास्त वाढ होणे) या सारखी पीसीओएसच्या कोणत्याही एका किंवा अधिक लक्षणांचा त्रास असल्यास, कृपया जवळपासच्या (स्त्रीरोगतज्ज्ञची) भेट घ्या. कारण, पीसीओएसमुळे अनेक दीर्घकालीन समस्या होण्याची जोखीम वाढू शकते उदा. वंध्यत्व (अपत्यास जन्म न देऊ शकणे), मधुमेह, वृदयाशी संबधित रोग आणि गर्भावस्थेत किचकट समस्या वैगरे. इमेज पीसीओएसचे लवकर निदान केल्यास त्यामुळे तुम्हाला भविष्यात वंध्यत्वासारख्या (अपत्यास जन्म न देऊ शकणे) यासारख्या दीर्घकालीन समस्या होण्यास प्रतिबंध होऊ शकतो. त्यामुळे, खूप उशीर होण्यापूर्वी उपाय करा. पीसीओएसवर कोणते उपचार आहे? पीसीओएसचे व्यवस्थापन करण्याचे अनेक मार्ग आहेत. लक्षणांच्या त्रिवरतेवर व्यवस्थापनाचे पर्याय अवलंबून असू शकतात.

जीवनशैलीत सुधारणा

पीसीओएस असलेल्या महिकांसाठी जीवनशैलीत आरोग्यसंपन्न बदल करण्यासाठी स्थितीचे व्यवस्थापन अतिशय मदत इमेज होऊ शकते. अश्याप्रकारे पीसीओएस असलेल्या सर्व महिलांसाठी, तुम्ही लठ्ठ असतात किंवा सडपातळ तरीसुध्दा जीवनशैलीचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. आरोग्यसंपन्न आहाराचा वापर केल्यास, त्यामुळे तुम्हांला पोषक द्रव्ये, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा आरोग्यसंपन्न आहार मिळत आहे याची काळजी घेतली जाते आणि त्यामुळे तुमची मधुमेह आणि वृदयाशी संबधित रोग यासारख्या रोगाची जोखीम कमी होऊ शकते. कमी जीआय असलेला आहार घ्या, कमी ग्लायसेमिक इंडेक्स (जीआय) असलेले पदार्थ खाण्यामुळे ती व्यक्ती तिच्या रक्तशकरेंच्या अधिक चांगला समतोल राखू शकते आणि इमेज पीसीओएसच्या लक्षणांमध्ये सुधारणा करु शकते. कमी जीआय असलेल्या पदार्थामध्ये आख्खे धान्य, मेद नसलेली (लिन) प्रथिने, दाणे आणि बिया, आणि भटपुर ताजी फळे आणि पिष्टमय नसलेल्या भाज्या, यांच्या समावेश होतो. तुमच्या खास गरजेनुसार कोणते पदार्थाचे पर्याय सर्वोकृष्ठ आहेत हे जाणुन घेण्यासाठी तुमचे डॉक्टर किंवा पोषकतज्ञ यांच्याशी चर्चा करण्याची खात्री करून घ्या. कमी चरबी असलेला ...

sitebar add 2