sitebar add

डॉ. सुरेश कांबळे यांचा बद्दल.

जेव्हा डी. एड झालेला प्राथमिक शिक्षक शिक्षकी पेशा सुरु झाल्यानंतर सुप्त इच्छा पुर्ण करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयात जातो...

मु.पो. लाहोरा, तालुका उदगीर जिल्हा लातूर, या लहानश्या खेड्यात डॉक्टर सुरेश यांचा जन्म झाला...

कौटुंबिक परिस्थिती पैशानेच नव्हे तर सर्वच अर्थाने नाजूकच होती. परिस्थितीशी दोन हात करत 10 विपर्यंतचे शिक्षण लाहोरा येथील जिल्हा परिषद शाळेमध्येच पूर्ण केले. लहान वयापासून डॉक्टर होण्याची मनीषा होती. म्हणून उदगीर येथील महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. पण 12 वी सायन्स झाल्यानंतर एम. बी. बी. एस. ला प्रवेश मिळु शकला नाही. पोटापाण्यासाठी काहितरी केलेच पाहिजे म्हणून त्यावेळचा जवळचा जो पर्याय होता तो निवडला. डी. एड. केले व प्राथमिक शिक्षकांची नोकरी पसत्कारली. ज्ञानदानाचे काम सुरुच होते पण वैद्यकीय क्षेत्राकडे असलेली आवड मात्र स्वस्थ बसु देत नव्हती. म्हणून 2000 साली वैद्यकीय अभ्यासक्रमाची पहिली पूर्वपरीक्षा दिली. तिथेही एम. बी. बी. एस. ला प्रवेश मिळाला नाही. मात्र बी. ए. एम. एस. साठी पात्र झाले आणी गुणे आयुर्वेदीक महाविद्यालयात प्रवेश घेऊन बी. ए. एम. एस. पुर्ण केले.

कदाचित आज डॉक्टर कांबळे यांचे सर्वपरिचित रसायन तयार झाले आहे ते सेवाभावी शिक्षकी वृत्ती आणि भारतीय  वैद्यक शास्त्राचा अंगाने उपचार यातून तयार झालेला अवलिया डॉक्टर बी. एड. आणि नंतर आयुर्वेदात पदवी मिळाल्याने तयार झाला असावा.

आवड म्हणून डॉक्टर होण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा संघर्ष करून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले व सेवाभावी व्रत अहोरात्र पणे कर्तव्य भावनेने अविरत पेलवत आहे.

दरवर्षी सरासरी 22,000 बाह्यरुग्ण विभागात रुग्णांचे उपचार डॉक्टर कांबळे करत आहेत. 10 वर्षात एकूण 25,000 प्रसूती, 4000 संताहीन जोडप्यावर वंध्यत्व निवारण उपचार त्याच बरोबर सरकारी दवाखान्याकडे जनसामान्यांच्या दृष्टीकोन बदलून गरीबापासून ते श्रीमतापर्यंत सर्व स्तरातील लोकांना सरकारी दवाखाना आपला वाटावा यासाठी अथक परिश्रम सुरू आहे.

स्त्री भ्रूण हत्येचा विरोधात स्वतः डॉ. कांबळे यांनी जन्म तिला घेऊ द्या, सुंदर जग तिला पाहुद्या हे नाट्य लेखन व दिग्दर्शक केले. त्यांचे बऱ्याच ठिकाणी यशस्वी प्रयोग देखील झाले. स्त्री आरोग्यावर शेकडो व्याख्याने दिली. जागतिक स्थरावर आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेमध्ये 19 मे 2016 रोजी लंडन येथे वंध्यत्व निवरणावर व्याख्यान केले.

राज्यस्तरीय पत्रकार संरक्षण समितीतर्फे वैद्यरत्न महाराष्ट्र 2016 पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य शिरोमणी पुरस्कार मा. आरोग्य मंत्री यांच्या हस्ते नुकताच त्यांना प्रदान करण्यात आला आहे.

Comments

sitebar add 2

Popular posts from this blog

औषधपचार

२) अनियमित मासिक पाळी

आई सुंदर होण्यासाठी..!